Author Topic: जखडलोय आम्ही  (Read 1293 times)

Offline yogeshingale

 • Newbie
 • *
 • Posts: 23
जखडलोय आम्ही
« on: November 24, 2013, 10:11:35 PM »
जखडलोय आम्ही

जखडत चाललोय आम्ही , अडकत चाललोय आम्ही.
का ? कशात? कुठल्या जाळ्यात
माहित नाही का? , पण जखडलोय आम्ही .

कधी नात्यांच्या बंधात , तर कधी प्रेमाच्या गंधात ,
कधी धर्माच्या दंग्यात , तर कधी सरकारच्या फंद्यात
अडकत चाललोय आम्ही
माहित नाही का? , पण जखडलोय आम्ही .

वाट तर दिसतेय समोर , पण पाय हलत नाही .
वाचा आहे , पण शब्द फुटत नाहीत
मनात अश्रूंचा पाट आहे, पण प्रवाहाच मिळत नाहीय .
माहित नाही का ?, पण जखडलोय आम्ही .

वार होतोय आमच्या वरती , तलवारी हि आहेत आमच्या हाती
पण ती चालयची मुभा आम्हाला नाही .
तृतीयपंथांना  षंड म्हणता म्हणता , दुसऱ्यांच्या तालावर नाचणारे षंड बनत चाललोय आम्ही.
माहित नाही का? , पण जखडलोय आम्ही .

------- योगेश इंगळे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: जखडलोय आम्ही
« Reply #1 on: November 27, 2013, 04:38:02 PM »
छान .... :)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: जखडलोय आम्ही
« Reply #2 on: November 27, 2013, 10:53:01 PM »
Khup chhan

Offline yogeshingale

 • Newbie
 • *
 • Posts: 23
Re: जखडलोय आम्ही
« Reply #3 on: December 07, 2013, 06:56:06 PM »
धन्यवाद !!!