Author Topic: म्हसूबाबाच गाणं १  (Read 591 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
म्हसूबाबाच गाणं १
« on: November 28, 2013, 08:47:45 PM »


म्हसूबाबाजींचे घर
असे उंच ओट्यावर
त्याला हवेच्याच  भिंती
वर आकाश छप्पर

लाल शेंदरी पोशाख
मस्त बसतो ऐटीत
भय जनाच्या मनात
राज्य करतो झोकात

त्याला ठेवियले कुणी
खोट्या आशेने मांडून
किती दिलेत भयाने
नजराणेही आणून
 
कुणा मागत तो नाही
कुणा देत किंवा काही
घडो घटना काहिही
श्रेय त्यालाच ते जाई

मना मनामध्ये आहे
म्हसू बाबाचा दरारा
अर्धा गाव अवसेला 
करी तयाला मुजरा

विक्रांत प्रभाकर             
« Last Edit: April 19, 2014, 12:38:03 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता