Author Topic: जन्म  (Read 966 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,268
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
जन्म
« on: December 22, 2013, 01:02:34 PM »
जन्म

एक दुसऱ्याच्या सहाय्याने,
निर्मित – केवळ
चेतनामय कृती,
माझी, त्याची, सगळ्यांची,

प्रत्येकास आधार
एक दुसऱ्याचा
चालायला - बोलायला अन,
जीवंत आहोत म्हणून
जगायला,

सुटणार नाहि हा आधार
अगदी, चराचर विश्वांतापर्यत,
ठावूक  आहे... कि
आधारा शिवाय,
अनंतात अंत होणार नाहि,

तरीही,
विलीन होणाऱ्या प्रक्रियेला
मिलन म्हणतो,
तेंव्हा मात्र,
कुणाचाच आधार नको !


©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता