Author Topic: वर्षांतील क्षण अन क्षण  (Read 943 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
वर्षांतील क्षण अन क्षण
« on: January 04, 2014, 03:26:53 AM »
वर्षांतील क्षण अन क्षण

  मृत्युशी झुंज देत होती

आल्या-गेल्याचे तरीही

  स्वागत ती करत होती ।

 
स्वागत ती करत होती

  स्वदेहीच्या वेदना विसरून

काया निचेष्ट झाली तरी

  मुखावरती हंसू ठेवून ।

 
मुखावरती स्मित होते पण

  शरीर मात्र झिजत होते

विझणार्या जीवनज्योतीचे

  क्षण जवळ आले होते ।

 
घातकी एक झुळूक आली

  प्रज्वलित अन ज्योत झाली

बोलता बोलता क्षणांत एका

  गात्रे सारी थंड झाली । ।   रविंद्र बेंद्रे

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/07/in-rememberence.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: वर्षांतील क्षण अन क्षण
« Reply #1 on: January 06, 2014, 10:29:52 PM »
khup chan....  :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]