Author Topic: मी हिजडा का झालो ?  (Read 996 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,191
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
मी हिजडा का झालो ?
« on: January 05, 2014, 08:00:38 PM »
दोन दिवसापूर्वी आकांक्षा थियेटर, पुणे प्रस्तुत, सागर लोधी लिखित व दिग्दर्शित नाटक “हिजडा” पहिले, विषय रोजचाच, पण अंतर्मुख करणारा, त्यातील जाणवलेल्या आशयाच्या वेदनांची कविता.
 
मी हिजडा का झालो ?

मी तसा का नाही झालो?
मी असा कसा झालो ?
दैवाला माझ्या सवाल माझा
मी हिजडा का झालो ?

गुरफटलो भावनांच्या गुंत्यात
जगायचे केवळ जगत आलो,
नाकारून दुनियेने साऱ्या
मी हिजडा का झालो ?

दोष कुणाचा? कसा? कधी ?
विचारीत मनाला प्रश्न आलो,
पचवीत हेटाळणी समाजाची...
मी हिजडा का झालो ?

हवे जगणे सामान्य मला
मलाच मी मनवित आलो,
अस्तित्व आमुचे करा मान्य
विनंती तुम्हा करण्या आलो !

उरतो पुन्हा एक प्रश्न...
मी हिजडा का झालो ?
मी हिजडा का झालो ?


© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com
9422779941 / 9545976589

Marathi Kavita : मराठी कविता

मी हिजडा का झालो ?
« on: January 05, 2014, 08:00:38 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):