Author Topic: ऱ्हास संस्कृतीचा  (Read 768 times)

Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
ऱ्हास संस्कृतीचा
« on: January 11, 2014, 12:08:23 AM »
या दिखावटी जगात
भावना मृत झाल्या
आता कुठे ती माया
चक्षु कडा त्या ओल्या
नाते गोते वृथाची
अन परंपरा पृथक
दिसती आता  जगी या
नुसते जीव घेणे नाटक
कोमल  प्रेमळ भावनांना
पोखरले  कसे उदळीने 
जगी कुठे, लोपला  हो
प्रेम झऱ्याचे खळखळने
अंतरंगीचा  प्रेमळ प्रवाह
असा का हो परका झाला
की लेकरू निश्छल मायेला
या जगी पोरका झाला
विदेशी जीवघेणे  खुळे अनुकरण
आता कधी हो संपुष्टात येणार
की ऱ्हास स्वाभिमानी संस्कृतीचा
'"भारतीस '"समूळ पंगू करणार
करू एवढीच आशा
येणाऱ्या उषक्काली 
जागे होतील नशेतून
असता हाती हि खेळी …….
                                  सुनिता
                                        १०जानेवारी २०१४

Marathi Kavita : मराठी कविता