Author Topic: नाविन्य  (Read 838 times)

Offline samvit khadilkar

  • Newbie
  • *
  • Posts: 1
नाविन्य
« on: January 11, 2014, 03:51:01 PM »
रानात भटकलेला,
जेव्हा सरावतो एकांताला,
कधीतरी कंटाळा,
येतोचि त्याला!

रानाच्या पलीकडचे,
कौलारू कवडसे ,
न्याहाळता एकटक कुतूहलाने ,
नाविन्याची चाहूल हळूवार उगमे !

माणसात हरवलेला ,
जेव्हा वैतागतो गर्दीला ,
रानातला एकांत,
खुणावतो त्याला !


अलिप्तता नसे त्याच्या ठायी,
नाविन्याच्या बेड्या बांधिल्या पायी !
परिस्थिती बदलण्याची हौस ज्याला,
कधीतरी कंटाळा येतोचि त्याला !!!

- संवित

Marathi Kavita : मराठी कविता