Author Topic: सून  (Read 649 times)

Offline sunitav

  • Newbie
  • *
  • Posts: 30
सून
« on: February 04, 2014, 04:35:33 PM »
घेऊ द्या मोकळा श्वास
थांबवू द्या जीवाची घुसमट
कशाला पाहिजे जुन्या विचाराची वळकट ?

सासरा जेवत असताना तिथेच उभ राहायचं
सासूने काही बोलल तरीही उलट उत्तर नाही द्यायचं
सगळ्यांशी चांगल वागायचं
किती म्हणून सोसायच ?

हे कर ते नको करूस
अस किती दिवस चालायचं ?
असच चालत राहणार,
तर सासू सूनेच कधीच नाही पटायचं

रिती रिवाज सारे सुनेसाठीच का ?
मुलीला तुमच्या यातलं माहित तरी आहे का ?
ह्याचा कुणी विचार केलाय का ?

उबग आला आहे सगळ्या गोष्टीचा
विचार केला आहे स्वतःसाठी जगण्याचा

बंड करून उठलंय मन
झुगारून द्यावेत सगळे बंधन
आणि जगावे मुक्त जीवन

पण अस मुक्त जगता कधीच नाही येणार
मनातले विचार मनातच राहणार

सुनिता .

Marathi Kavita : मराठी कविता