Author Topic: दुर्गा  (Read 628 times)

Offline sunitav

  • Newbie
  • *
  • Posts: 30
दुर्गा
« on: February 07, 2014, 08:32:26 AM »

तुला काय वाटलं मी अजून अबलाच राहिली
ये विसर आता पुराणातली वांगी पुराणात राहिली

बायकांशी बोलताना जरा अदबीने बोल
नाही तर बडवेन भर चौकात तुझ्या इभ्रतीचे ढोल

पाहतोस काय असा माय बहिणींकडे वासानाधुंद
उतरवून टाकीन तुझी फटक्यात पुरुषी धुंद

आवर हा तुझा लगटपणा नको येवूस तू माझ्या अंगचटीला
भर रस्त्यात थोबाड रंगवेन धरून तुझ्या बखोटीला

तुझा माज तुझी मर्दानगी तुझा सैतानी अवतार
आवर आता पाहशील जागृत स्त्रीच्या जगण्याची धार

अरे बायकांची अब्रू म्हणजे तुझ्या बापाची जायदाद ?
शिकवेन कायमचा धडा मग पाया पडून मागशील क्षमेची दाद

तुझ्या मर्दानगीच्या गाथा खिशातच ठेव
भर दिवसा बाईची अब्रू जाता कोठे जातो तुझा चेव

दिसली बाई कि लगटपणा सुरु तुझा भाड्या
बास लई झालं नामर्दा ! नाहीतर आवळेन तुझ्या नाड्या

जर काही गोड बोलले तर झाला लगटपणा सुरु
तुझ्या पुरुषी माजोरीला आता इथल्याच मातीत पुरू

तू माझ्यातील खरी दुर्गा कालिका पाहिलीस नाही
कारण तुला माझ्यासारखी रणरागिणी भेटलीच नाही

आयुष्यभर पदरात राहून तिने धुतले तुझे पाय
खूप सोसलं बाई म्हणून तिचं मन कोणी जाणलंच नाय

स्त्रियांची झेप कर्तबगारी धडाडी तुला चांगलीच माहित हाय
जरा स्त्री पुढे गेली तुझ्या पोटात का दुखते हेच कळत नाय ?

एकदा मी दुर्गेचा अवतार घेतला कि मी ऐकायची नाय
मुंड्या चीत करून तुला धडा शिकवल्याशिवाय राहायची नाय

बघ स्त्री म्हणजे तळपती वीज वणवा अंगार आहे
निमुटपणे सहन केलेल्या पुरुषी जुल्माविरूद्ध यल्गार आहे

आता सुधर रे ! मर्दा ! तुझ्या चौकटीत रहा आता
आपल्या आया बहिणींचा आदर करायला शिक आता

नाही तर स्त्री जातीशी गाठ आहे रे भाड्या …
तुला शिकवेन मी आता चांगलाच धडा ..

हि कविता मी फक्त जे लोक बायकांची छेड काढतात किवा त्यांना पाहून इशारे करतात अशा लोकांना उदॆशुन लिहिली आहे.
सुनिता
तुला शिकवीन चांगलाच धडा …

Marathi Kavita : मराठी कविता