Author Topic: ... अन्नपूर्णा ...  (Read 840 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
... अन्नपूर्णा ...
« on: February 24, 2014, 06:11:42 PM »

अगदी सहजतेन
जेव्हा कुणी देते फेकून
तयार सुंदर अन्न
मुले खात नाही म्हणून
वा जास्त झाले म्हणून
माझ्या अंगावर येतो शहारा
अस्वस्थ होते मन
कुपोषितांच्या झुंडी
धावतात मनातून
आक्रंदत बुभूक्षितागत
मोठमोठ्याने ओरडत
अन्न अन्न अन्न
संस्कारात जपलेली
अन्नपूर्णा अन
भेदरून उभी असते
कचराकुंडीचा काठ
घट्ट हातात धरून 
 
विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 12:27:19 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता