Author Topic: . नामर्द... मी... मामू ...  (Read 790 times)

Offline swami sakha

  • Newbie
  • *
  • Posts: 6
. नामर्द... मी... मामू ...
« on: March 05, 2014, 01:20:40 PM »
.. नामर्द... मी... मामू ...


दुर्दैवी जन्म आला नशिबी माझ्या
इतरांपेक्ष्या वेगळेपण वागणं
चालणं बोलणं समाजाच्या नजरते लगेच भरलंय
जन्मदात्यांनी मग वाहून टाकलं
यल्लमा  देवीला तिचाच आधार
पण हे काय जगणं आहे ??
नेहमीच कुचेष्टा येता जाता
मानहानी सहन करत ....
सवय झाली लुगडं साडी नेसत
चेहरा रंगवत ह्या मर्द समाज्यात  वावरता 
आतील पुरुष नामर्द असल्याचं
शल्य पदोपदी खातंय  पण स्वीकारलं
मी शेवटी जन्माचे भोग समजून
अवतीभवती  विकृत 
नजरा गिधाडासारख्या
भिरभिरतायात माझ्यातील
त्या नामर्द देहाला तीक्ष्ण नजरेने
पहात विकृतीच्या  वणव्याचा दाह
जरा अंगाला लागू नं देता
जगतोय एक हिजडा म्हणून
मी बिनधास्त वावरतोय ट्रेन बस
बाजारात यात्रेत लग्नसमारंभ
वरातीत  नाचतोय अंगविक्षेप करत
पैश्यासाठी करमणूक  फक्त करमणूक
करतो  नामर्द देह नाचवून ............
मनाला अतीव दुःख झाले तर ....
आरश्यासमोर स्वतःलाच
पहात टाळ्या वाजवतो
हातवारे करत घालतो शिव्या
कुत्र्यासारखं मरत फरफट होणार कुंडीपर्यंत
मग मी माझ्यातला …।
मीच हिजडा समजूत घालतो माझी
परत साडी आवरत चेहरा रंगवत
शेठ्जीच्या दुकानासमोर टाळी
वाजवत आशीर्वाद देत
 " शेठजी ! आज सौ की पत्ती मंगता है "
ढोलकीच्या  तालावर फिल्मी गाणी गात
 तेवढ्यात गर्दीतून आवाज येतात
 " हे मामू ! क्या आयटम  लग रही है यार """" !
दुर्लक्ष्य करत टाळी वाजवत रडतंय
मन आतल्या नामर्द देहाला कोसत ........
-- सुनील ..........

Marathi Kavita : मराठी कविता


Bhushan Kasar

  • Guest
Re: . नामर्द... मी... मामू ...
« Reply #1 on: March 05, 2014, 06:03:18 PM »
Dear Mr. Swami Plz give me your Mobile No. My No is 9579553690
I like this Poem a lot