Author Topic: संताच्या नातवा..  (Read 588 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
संताच्या नातवा..
« on: March 18, 2014, 01:07:27 PM »
मजला कळेना गादीचा प्रकार
संताच्या नातवा कैसा अधिकार
मानसिकता ही इथल्या जनाची
सवय असे का सदा गुलामीची
काय त्याने इथे मिळविले असे
जनासी दिधले कधी काय कैसे
त्यांना विचारीता शब्दे डाफरती
भक्ताळले डोळे मोठे वटारीती
अथवा मिळतो फटक्यांचा मार
चौदाही पिढ्यांचा घडतो उद्धार
गादीवरी राजा अरेरे म्हणतो
मंबाजी नाटक छान वठवतो
अज्ञानी मी मूढ गरीब बिचारा
पोहोचतो पार नरकाच्या दारा
 
विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 12:21:27 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता