Author Topic: एकटा मी  (Read 1350 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
एकटा मी
« on: March 21, 2014, 01:09:56 PM »
तसा एकटा मी नव्हतो कधीही
जरी साथ काट्यांची होती मला
ठगले मला ना कुणीही परंतु
घरात भेटले घरभेदी मला
 
जाहली जरी ना कधी वाटमारी
फिरला घराचा वासा जरा
कुणी तोडले ना फुलांसी परंतु
आपलेच बोचले मनासी जरा
 
लुटणार होतो नारदास जेंव्हा
कळले मला मी वाल्या खरा
पापांत माझ्या न वाटेकरी ते
लुटीतच त्यांचा वाटा खरा
 
उरले आता ना ते भावबंध
झोपडी परक्यांची नको मला
वादळात सारेच वाहून गेले
पावसाची कशाला भीती मला
 
बुडाले जेंव्हा घरकुल माझे
आधार काडीचा झाला मला
बांधण्या शब्दांनी महाल व्यथांचे
आधार कागदांचा झाला मला
 
अमृत घेउनी ते सर्व पळाले
ठेवून प्राशण्या हलाहल मला
वैराग्य माझ्या नशिबात आले
''केदार'' नावाचा शाप मला
 
एकटाच होतो एकटाच आहे
उरले कुणी ना साथी आता
आधार खांद्यांचा शोधू कशाला
एकटेच चालणे नशिबी आता

कडवे पणानी आयुष्य पोळले
जगण्यात उरली ना गोडी आता
सवेच जळले ते कागद जेंव्हा
चितेवर लाभली शांती मला
 
केदार...

या कवितेच्या पहिल्या कडव्यातील ''तसा एकता मी नव्हतो कधीही'' या ओळी मला कशा सुचल्या हे माहित नाही. कदाचित मी कुठे तरी वाचल्या असतील. कृपया माहित असेल तर कळवावे.

Marathi Kavita : मराठी कविता