Author Topic: जात  (Read 847 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
जात
« on: April 27, 2014, 02:51:20 PM »
जात एक गाजलेली बाब हाय, मिळाली एकदाची कि बदलण्याची मुभा नाय। झोपडीत राहाय नाहीतर माडीत जाय, जातीशिवाय तुझ्या जगण्यात अर्थच काय।।१।। आसवांच्या झाडामंदी जनम तुले आला, पाटलाच्या पोरासाठी दवाखाना आला। जातीचा तु रे किती घेतला ध्यास, एका कोठडीत तुझा बंद हा श्वास।।२।। जात जात म्हणत आता उगवते पहाट, नशिबानं दिली तिच त्याची वाट। अंधाराच्या काळोखात गावाखाली घरटं, नसे पार करता यायचं त्याला गावाचं ऊंबरठं।।३।। जात देई पावसाच्या पाण्यासारखी साथ, नसता गुण्हा तरी त्यांना का मिळते लाथ। समाजात उगवलेल्या साथीचं हे रोपटं, धर्माच्या नावानं बांधलय घरटं।।४।। जात जात म्हणता शेवटी काय, शाळेतल्या सुट्टीत मिळणारा भात..? अंधारात झगडणारी, दिव्यातली वात।।५।। ↝↝S.S.More↜↜
« Last Edit: September 06, 2014, 05:33:24 PM by Sachin01 More »

Marathi Kavita : मराठी कविता