Author Topic: मुलीच आयुष्य हे असच असत..  (Read 1534 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
मुलीचे जीवन असच असत,
वेळ आणि तिच सारखच असत..

ज्या कुटुंबात मोठ्ठ व्हायच असत,
शेवटी त्यांनाच सोडून जायच असत..

ज्या आईच बोट धरुन चालण शिकायच असत,
तिच्या हातानच परक्या घरी जायच असत..

ज्या वडिलांच्या खांद्यावर खेळायच असत,
त्याच खांद्यावर डोक ठेवून रडायच असत..

ज्या भावाला भांडून रडवायच असत,
त्याला सोडून जाताना स्व:त रडायच असत..

मुलीच आयुष्य हे असच असत..