===================================================================================================
आठवतो त्या आठवणी..
ते क्षण... त्या भावना....
असे सर्व काही ती डायरी....
विझले ते सर्व...ओल्या अश्रूंनी...
उरली ती आता गळकी पाने...
नावास एक डायरी..पुस्तक..आयुष्याचे!
पानं भरली सु:ख-दु:खाची
आठवणीतल्या चेहय्रांची....
काही पानं कोरीच राहून गेली...
काळासकट.. का ती गळून गेली....
पाने उलटता उलटता..
उमटतात ठसे कागदांवर त्या...
जिथे होती ती नावं..पुसली गेलेली...
लिहीता लिहीता अश्रू ओथंबले...
लिहावसे वाटले.. पण....ते पान गळून गेले....
आयुष्याचे पुस्तक... एक साधी डायरी..
गळक्या पानांचे पुस्तक नाही
असे फक्त शिल्लक रद्दी....
असे एक गळके पान आयुष्यातले....
आठवणींसकट गळून गेल....
ना पलटले पुन्हा मागच पान..
पुढे आयुष्य चालतच गेल
===================================================================================================
===================================================================================================