Author Topic: आपण ...?  (Read 1423 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,191
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
आपण ...?
« on: May 04, 2014, 09:34:53 PM »
आपण ...?

जगावं कि मराव ?
जगा अन जगू दया!
अशाच आमच्या गप्पा,
सृष्टी निर्मात्याला देखील
पडला असेल प्रश्न ?
मराव कि मारावं ?

रक्ताची तहाण
ओलावीत असेल त्याचा घसा,
आपली कृती बघून !
एकमेकांच्या रक्ताची
वाहती नदि बघून !

मनाच्या जन्मापासून
रक्ताभिषेक होत आलाय,
आपलाच लिखित इतिहास
याला साक्ष ...

खुप प्रगत झालोत आज
आदिमा पासून, अगदि
सृष्टी-देव इत्यादिंची 
मुळेच खणू लागलो !

आणि आनंद आहे,
मस्त आहोत, त्याच मस्तीत,
इतके कि...
अस्तीत्वच नको वाटतय दुसऱ्याचे,
जो सुद्धा प्रश्न घेऊन हिंडतोय,
मारावं कि मराव ?


© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता

आपण ...?
« on: May 04, 2014, 09:34:53 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):