Author Topic: पहाट  (Read 842 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
पहाट
« on: May 21, 2014, 12:51:06 PM »
कुञ्यावानी दैना कधी
फिटायचीच नव्हती
स्पृश्य-अस्पृश्यांची दरी
कधी मिटणारच नव्हती
जगण्याला आमच्या कधी किंमतच नव्हती
अन्यायाला विरोध करण्यासाठी
कुणात हिंमतच नव्हती
रोज-रोज मरण्याची
त्यांना सवय झाली होती
संपेल कधीतरी
अस कधी वाटलच नव्हत
ते वाटत नव्हत कारण त्यासाठी कुणाच्या अंगात बळच नव्हत
अन्यायाच अंगात विष पेरल होत
धर्माच्या नावान त्याच पिकही चांगलच काढल होत
आले तुम्ही अन्
केला खोडावर वार
बाबा तुमचे आमच्यावर लई उपकार
आले होते तुम्ही म्हणून
आम्ही माणसात आलो
अन् बाबा काय कमाल
आज त्या लोकांना पण वाटतय आम्ही माणूस झालो...

-S S More-

Marathi Kavita : मराठी कविता