Author Topic: आठवणी  (Read 2041 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
आठवणी
« on: May 22, 2014, 10:11:57 PM »
कधी हसवतात आठवणी
कधी रडवतात आठवणी
कधी गर्दीत मनात एकट करतात आठवणी
तर कधी एकट असताना मनात गर्दी करतात आठवणी

असतात भुतकाळाच्या साक्षीदार आठवणी
असतात भविष्याच्या जोडीदार आठवणी
बोलता-बोलता चुप बसवतात आठवणी
बोलता-बोलता ओठांवर हास्य फुलवतात आठवणी

मनाच्या कोपर्यात साचतात आठवणी
नकोशा वाटल्या तरीही मनात राहतात आठवणी
न सांगता मनात कायमक असतात आठवणी
पिशवीमध्ये कैद कराव्यात अशा आठवणी

झाडाखाली गेल त्या कि
आजपण कवेत घेतात त्या आठवणी
उन्हात आईस्क्रिम खाताना
ताज्या होतात आठवणी

अर्ध्या राञी मोबाईल वाजला
कि येतात त्या आठवणी
असले कितीही काम जरी
तरी डोळ्यात असतात आठवणी
 
     S.S.More
« Last Edit: May 22, 2014, 10:12:59 PM by Sachin01 More »

Marathi Kavita : मराठी कविता


deepali kore nikumbh

  • Guest
Re: आठवणी
« Reply #1 on: May 22, 2014, 11:10:21 PM »
आठवणी मधली एक जरी आठवण आठवली तर खुप छान वाटत

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
Re: आठवणी
« Reply #2 on: May 29, 2014, 01:30:52 AM »
thanx bt mhnje kay?