Author Topic: माझा विरोधाभास  (Read 832 times)

Offline sudhanwa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 56
  • Gender: Male
माझा विरोधाभास
« on: May 25, 2014, 01:02:05 PM »
तहान ही मला; कसली रे लागली?
विसरलो मी त्यांना,
ज्यांची वाळवंटात दिशाभूल झाली

नज़र ही माझी; आकाशी का लागली?
घारीची मान माझ्याकडे,
बघुन जर अवघडली

भिंत समोरची; माझा पल्ला का झाली?
क्षितिजाची लांबी जर,
अशक्य मापणी

हद्द कुंपणाची; का मी मिरवली?
विसरलो अथांगता,
मी त्या समुद्राची

क्षणोक्षणी माझे मन; विचलित का होते?
बगळ्याचे ध्यान माझ्या,
ध्यानी नाही येते

आत्मकेंद्री इतका; का मी झालो?
वटवृक्षाची छाया,
आज मी विसरलो

वस्तंुवर प्रेम माझं; एवढं का जडलं?
माणूस असून माणूसकी,
मी तर हरलो

बुद्धीचा मला; गर्व का व्हावा?
खांबातला नरसिंह,
मला न दिसावा

मतं ही माझी; कठोर का झाली?
वाहती वळणं पाण्याची,
दृष्टीआड कशी झाली

जाणीव या सत्याची; दशकापूर्वीच झाली
'कळतयं पण वळत नाही',
हि म्हण अशीच नाही रूढ झाली

Marathi Kavita : मराठी कविता