Author Topic: मरणाच्या दारात  (Read 1265 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
मरणाच्या दारात
« on: June 11, 2014, 08:19:13 PM »
मित्रांनो ,
खरच सांगतो
वेदनांनी विव्हळत
दुखांनी पिळवटत
मरणाच्या दारात
रडत अन रखडत
मी मरणार नाही
मी घुसेन आत
मृत्युच्या गुहेत
उघड्या डोळ्यांनी
शेवटच्या माझ्या
श्वासाला बघत
फेकून देत
देह कलेवर
एकाच क्षणात
**
तुम्ही म्हणाल
ही तर चक्क
आत्महत्या आहे
जीवनाचा त्याग
हा नक्कीच
भ्याडपणा आहे
पण यार हो
रिसायकलिंग देहाचे
गीतेचा फंडा आहे
कपडे बदलणे हा
आत्माचा धंदा आहे
कृष्ण माझ्या मरणाचा
वकील अन खंदा आहे
**
आणि म्हणाल जर
आत्महत्यारा पापी
भूत योनीत जातो
वर्षोनुवर्ष अतृप्तीत
उगाचच भटकतो
चिंता करू नका
एक छान भूतीन
तिथेही शोधीन
अन तिच्यावर
कविता करीत राहीन
ऐकायला यायचे तर.. 
..बघा वाट पाहीन .
**
पण हा देह
तोवरच वाहीन
जोवर मजला
वाहता येईन 
वेदनेच्या ओझ्यासह
हसत जगता येईन

विक्रांत प्रभाकर


 
« Last Edit: June 14, 2014, 03:31:51 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता