Author Topic: नंदादीप  (Read 711 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
नंदादीप
« on: June 18, 2014, 10:48:29 AM »
मिनमीनत आहे ज्योत,
काळजात तुझ्या ।
डोळ्या पुढे तुझ्या कसला पसरला हा काळोख ।
काजळी चढली तुझ्या चक्षुपटलावरती,
अंधा-या कोठढीत गुदमरते प्रकाश ज्योत ।
काजळीच खात आहे प्रकाशाची वाट,
साफ करून चक्षू तु लख्ख पाड प्रकाश ।
आत्मविश्वासाचे,चीकाटीचे घालुन तेलपाणी,
वेळोवेळी पुढे सरकावून वात,
अंधाराला गिळून टाकावा,
असा पाडावा प्रकाश ।
सारी सृष्टी ऊजळून जावी,
अखंड तेवत राहू दे तुझा नंदादीप ।

Marathi Kavita : मराठी कविता

नंदादीप
« on: June 18, 2014, 10:48:29 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):