Author Topic: दुखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी  (Read 1238 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
दुखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी
दारू बिरू पियुन अगदी झींगली होती कार्टी.
दुख म्हणाले "दोस्तानो!!बिलकुल लाजू नका
इतके दिवस छळले म्हणून राग मानू नका
मनात खूप साठलं आहे  पण काहीच सुचत नाही
माझी स्टोरी सांगितल्याशिवाय आता मला  राहवत नाही
मी आणि सुख दोघे जुळे भाऊ होतो
पाच वर्षाचे होतो तेव्हा एका जत्रेत गेलो होतो
गर्दी अशी जमली नि गोंधळ असा उठला.....
.माणसांच्या त्या गर्दीमध्ये सुखाचा हात सुटला
तेव्हापासून फिरतोय शोधत सुखाला दुनियेच्या जत्रेत
पाहतोय दिसते का सुख माझे कोणाच्याही नजरेत
सूखाबरोबरचे लहानपणीचे क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने दुख ढसाढसा रडले
नशा सगळ्यांची उतरली दुखाकडे पाहून
दुखालाही सुख मिळावे असे वाटले सगळ्यांना राहून राहून
सुखाच्या शोधामध्ये आता मी सुद्धा फिरतोय
दुखाला शांत करायचा खूप खूप प्रयत्न करतोय
जीवनाच्या रथाचे आहेत सुख दुख सारथी
सुख जर मिळाले तर सगळ्यांना तेंव्हा दुखाच्या घरी परत  मीच देईन पार्टी.......… .

कॉपी पेस्ट टेक्नोलॉजी च्या सहायाने . . . कविता ज्याची कुणाची आहे त्याच्याकडे कवितेचे हक्क पूर्णपणे अबाधित
-- Unknown