Author Topic: सौदा  (Read 651 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
सौदा
« on: September 22, 2014, 09:49:12 PM »

मनात दबल्या वेदना किती,खबर ना कुणाला
मीच मारले मला असे काल,वेदना ना कुणाला!

आहे तयांसारखाच मी ही माणुस,विसरले कसे
टोचली तयांनीच दाभने मनाला,खेद ना कुणाला!

जळतील रे वळ आगीत त्या देहावरचे
कोरुन ठेवल्या मनात जखमा,माहीत ना कुणाला!

जाणली दुःखे मी सा-यांचीच हसत हमेशा
पडद्यामागच्या त्या आक्रंदनाची, जाणिव ना कुणाला!

 केला सौदा मीच माझ्या मनाशी असा
ओठांनी हसायचं -त्यानं कुढायचं,कळलं ना कुणाला!


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता