Author Topic: ऐवज  (Read 594 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
ऐवज
« on: September 30, 2014, 07:40:35 AM »
तिनं.....
हळूच पाहिलं-
माझ्याकडं!
मी तिची नजर टाळत
तसाच चालू लागलो....
ती चुळबुळली-
तिनं माझा हात धरला
मी रागाने लालेलाल!
हात सोडवून घेता येईना
हात तसाच ठेवू वाटेना!
           अंगात मखमली कपडे
           कपड्यावर महागडे अत्तर
           गळ्यात लाँकेट
           हातात सोनेरी घड्याळ
           बोटात सोन्याच्या अंगठ्या
           असा माझा पेहराव!
हात हिसकावून घेतला
`अगं ये भिकारडे ,
लाज वाटत नाही
घाणेरडे हात लावायला ?`
             ती थरथरली.....
             मी तसाच डाफरतोय
             ती माञ-
             हमसुन रडतेय ....
`बाळ,ही तुझी अमानत
तुझ्या आईने माझ्याजवळ ठेवलेली !´
.......तिनं एक छोटी पेटी
माझ्या हातावर ठेवली.....
मी पाहिलं -
त्यात सोन्याच्या मोहरा!
.....मला आठवलं-
ती...ती....माझी `माई´होती
मला वाढवलेली....
मला पोसलेली,
माझ्या `आई´पेक्षा प्रिय असलेली!
पण..?
एक भिकारीण समजून
तिला मी झिडकारलं,
मागेही असंच एकदा
चोरीचा आळ घेऊन
हाकललं होतं....
तीच माई..
आज,
जवळ लाखो रुपयांचा
ऐवज असताना
स्वतः भीक मागुन खातेय
अन्
`विश्वास´म्हणजे काय
ते मला शिकवतेय!

मी माञ,
पेटी घेतोय....
गाडीत बसतोय....
अन्
धरतोय वाट सराफकट्टयाची
- मागे वळून न पाहता !


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता