Author Topic: हि खुर्ची कोणाची  (Read 783 times)

Offline shaan@5

  • Newbie
  • *
  • Posts: 9
हि खुर्ची कोणाची
« on: October 02, 2014, 08:48:33 PM »
हि खुर्ची कोणाची  :D

रंगली स्पर्धा इथे सत्तेची
लक्ष्मन रेषा त्याला आचारसंहितेची
ज्याला त्याला घाई खुर्चीत बसायची
आरे वीरानो …. पण हि खुर्ची कोणाची

पंजाने घड्याळाला चाबी द्यायची
का धनुष्याने कमळ खुडायची
डाव फक्त एकमेकांवर कुरघोडी करायची
आरे वीरानो … पण हि खुर्ची कोणाची

एकमेकांवर कायम टीका करायची
अन वेळ आली कि गपचूप दोस्ती करायची
नाहीच जमला काही तर थोरांची कास धरायची
आरे वीरानो … पण हि खुर्ची कोणाची

सहनशीलता संपली आता जनतेची
गरजच काय वेगळ्या  करमणुकीची
चाललीयेत नाटकच रोज  तुमची
कळेलच …. हि खुर्ची शेवटी कुणाच्या लायकीची  >:(

शान

Marathi Kavita : मराठी कविता