Author Topic: रेल्वे अपघात...  (Read 644 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,268
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
रेल्वे अपघात...
« on: October 04, 2014, 03:29:08 PM »
रेल्वे अपघात...

पुर्वी देखभाल रेल्वेची
कर्मचारीच करीत भली,
अपघाताची वेळ तेंव्हा
चुकुन यायची कधीकाळी !

नाही सरकायचे सांधे
असायचं बारीक ध्यान,
अविरत काम करून
ठेवायचे लक्ष गॅगमॅन !

काॅन्टॣक्ट काळात आज
केवळ महत्व पैशाला,
प्रवाशांना दयावी सेवा
विचारच नाही कुणाला !

उपनगरी रेल्वे प्रवासी
मेंढरागत गरीब झालेत,
रेल्वेला हल्ली अपघात
खरच नित्याचेच झालेत !

©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता