Author Topic: जखमा भरतातच सगळ्या  (Read 897 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
जखमा भरतातच सगळ्या
« on: October 04, 2014, 10:23:53 PM »
जखमा भरतातच सगळ्या
असे ते म्हणतात 
पण हे काही खर नाही
सदुसष्ट वर्ष झाली
ती जखम अजून भरत नाही
हिंदुस्तानचा जन्म अजून होत नाही
ती जखम घेवून मेलेत किती
किती मरणार माहित नाही
ती सरहद्द त्या तारा ते कुंपण
ती दुष्मनी तो वैराचा अंगार
का कधीच संपणार नाही
कळत नाही

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: October 05, 2014, 10:23:22 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता