Author Topic: मी आिण माझा एकांत ....  (Read 1118 times)

Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 346
  • Gender: Female
मी आिण माझा एकांत ....
« on: October 08, 2014, 12:14:30 AM »
मनाला लागलेला किवतेचा छंद....
आिण तो बेधुंद करणारा आनंद....
सहसा असणारी मी िनशब्द....
तेव्हा हातातून िनसटलेले हे शब्द...
भान हरपुन गेलेले हे िचत्त ....
मी आिण माझा एकांत....

चहूकडे दरवळलेला रातराणीचा सुगंध ....
त्यावरील काजवे भासती मज स्वच्छंद....
चंद्रावर रागावलेल्या चांदणीची खंत...
मी आिण माझा एकांत .....

दुनीयेच्या गर्दीत स्वतःला शोधण्यात
मी गर्क
मग या "स्व'' साठी लावलेले तर्क-िवतर्क
स्वपनातल्या स्वप्नांचा झालेला अंत...
मी आिण माझा एकांत ....

गेलेले क्षण आिण येणारी वेळ ....
दोघांचा न जुळणारा मेळ ....
िवचारांचा चालतो असाच खेळ ....
हा लपंडाव बघण्यात रमुन जाते
ही सांजवेऴ...
अबोल ही िनशा... वारा हा शांत .....
शेवटी उरतो तो बस... मी आिण
माझा एकांत ....


http://anamikaak.blogspot.com/?spref=fb
« Last Edit: October 17, 2014, 12:21:56 PM by @Anamika »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline shaan@5

  • Newbie
  • *
  • Posts: 9
Re: मी आिण माझा एकांत ....
« Reply #1 on: October 08, 2014, 06:10:51 PM »
Mast  ;)