Author Topic: मी  (Read 1084 times)

Offline Shraddha R. Chandangir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 346
 • Gender: Female
मी
« on: October 09, 2014, 06:59:22 PM »
सांगून व्यथा आपुली हळहळली मी
मर्म त्याचे कोणी जाणलेच नाही.....

शब्द माझे लाख घेऊन चूकले
अर्थ त्याचे कोणाला ऊलगडलेच नाही....

बघणार्याने बघीतले हसरे डोळे माझे.....
अश्रू त्याचे कोणी टीपलेच नाही....

मत्सर माझा बघून थक्क झाले सगळे,
त्या मागचा ईतीहास कोणी वाचलाच
नाही....

आज कौतूक माझे करण्यात दंग झाले सगळे,
हेच का होते काल नींदक काही कळलेच ऩाही....

माझ्या कवीतेच्या मेहेफीलीत रंगले सारे....
पण भावनांचे त्या रंग कधीच हरवले,
कोणी ताडलेच नाही.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline सुमित

 • Newbie
 • *
 • Posts: 25
Re: मी
« Reply #1 on: October 12, 2014, 06:15:04 PM »
Really heart touching...best..

Offline Shraddha R. Chandangir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 346
 • Gender: Female
Re: मी
« Reply #2 on: October 12, 2014, 06:32:40 PM »
thnXx....