Author Topic: ..जिंदगीचा लोच्या....  (Read 909 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
..जिंदगीचा लोच्या....
« on: November 05, 2014, 12:43:57 AM »

तसा तर जिंदगीचा
लोच्या साऱ्या झाला आहे
इस्त्रीचे कपडे वरी
रंग विटलेला आहे

सक्तीचीच पोटभरू 
चिटकवली नोकरी
बळे सांभाळतो नाती
बांधलेली व्यवहारी

उपाशी मरण्याहून
हे सुद्धा वाईट नाही
पोट भरणे म्हणजे
पण जिंदगानी नाही
 
फेकायला हवे तेच
अविभाज्य झाले आहे
जीवनाने म्हणा जणू
कि गुलाम केले आहे

किती मारू रोज रोज
तेच तेच सात फेरे
बांधलेली गाठ आहे
मानुनिया उगा खरे

सुटकेचा मार्ग बंद
गाव गल्लीचा तुरुंग
छाती काढून चालणे
करणे मुक्तीचे सोंग
 
आणि काही करू जाणे
असते बंड फसणे
गळ्यामध्ये फास अन
फळीस दूर लोटणेविक्रांत प्रभाकर
« Last Edit: November 05, 2014, 01:03:23 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता