Author Topic: ‪स्वार्थ‬  (Read 852 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
‪स्वार्थ‬
« on: November 07, 2014, 05:34:53 PM »
आज झोप का बरं येत नसावी,
बाहेर येऊन आकाशाकडे पाहिलं,
तर त्याने मला इशारा केल्याच भासलं, चंद्राने हडबडून ठासले मलाही तुझ्यासारखी कधीतरी सुट्टी असावी,
माझी स्वारीही कधीतरी दुर जावी,
माझ्याही परिवारासोबत एखादी तरी सहल फिरावी.
तुझ्या या स्वार्थी जगासाठी का गुलामी करावी?
डोक्यात मारुन मी परत घरात आलो,
घरातला लाईट पाहून त्याच्याजवळ गेलो
त्याच्याजवळ जाताच त्याने आरोळी ठोकली
तुमच्यासाठी केली तुम्ही माझी बर्बादी केली..

Marathi Kavita : मराठी कविता