Author Topic: लेखणीला तुझ्या धार कर  (Read 629 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
लेखणीला तुझ्या धार कर
« on: November 18, 2014, 09:24:12 AM »
लेखणीला तुझ्या धार कर
अन्यायावर वार कर
ठेऊन ठेऊन गंज लागला
चालवून तिला चमत्कार कर ! !

टाक आता प्रेमाची कात
धर आता संघर्षाची साथ
दे गरीबाच्या हातात हात
छत्रपतीची शपथ तुला
दुश्मनावर प्रतिवार कर !
लेखणीला तुझ्या धार कर
अन्यायावर वार कर ! !

नको होऊ प्रेमासाठी वेडा
जा कधीतरी गाव खेडा
लेखणीत उतरव शेतकऱ्यांच्या पीड़ा
शेतकऱ्यासाठी, चालू कर लढा
समजावून त्यांना प्रेमाने
आत्महत्या तेथून हद्दपार कर !
लेखणीला तुझ्या धार कर
अन्यायावर वार कर ! !

जात आहेत कुठे रक्ताचे सांड
थांबव तेथील जातिवादी हत्याकांड
जाऊन त्या, राक्षसाला भांड
ढाल बनवून तेथे समानतेची
जातिवाद्यावर वार कर !
लेखणीला तुझ्या धार कर
अन्यायावर वार कर ! !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता