Author Topic: कसले हे माता पिता ?  (Read 767 times)

Offline savita tajane

  • Newbie
  • *
  • Posts: 15
कसले हे माता पिता ?
« on: November 19, 2014, 03:32:49 PM »
किती हे सुंदर तू छान सुगंध तूला
सौंदर्याचा तुज़ा हे वा वाटतोय मला
मी ही एक तुझ्या सारखी उमलेल
आसमंत सारा सुगंधाने दरवळेल
पण मी उमलेपर्यंत का ही मानव जात थांबेल ?
की उमलण्याधीच् मलाही तोडेल ?
फूल म्हणे काळीला ......
उमलु न फूल होण भाग्यात होत माझ्या
काय सांगावे ? काय नशिबात आहे तुझ्या ?
पोटच्या काळीलाही उमलुन देत नाही ही मानव जात
तुझ्या माझ्या खुडण्याची कोणाला व्यथा ?
नाते ममतेचे ना राहिले आता
गर्भातच कळी खुडनारे कसले हे माता पिता ?
                                 --सविता ताजणे

Marathi Kavita : मराठी कविता