Author Topic: खर रुप  (Read 660 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
खर रुप
« on: November 20, 2014, 01:56:23 PM »
चेहर्याची सुंदरता गाणार्या या माणसांना,
शुद्द अन् पविञ मनाच सौंदर्य समजणार कसे?

पैसा अन् खोट्या फुशारक्या मानणार्यांना,
दोन मनांच नाते समचेन कसे?

आपल्या खोट्या इज्जतीचा पंचनामा करणार्यांना,
इज्जतीपेक्षा जिवन श्रेष्ठ समजणार कसे?

आपल्याच मनासारखं दुसर्यांना वाकवणार्यांना ,
निस्वार्थ प्रेम पटेल कसे?

पैसा , इज्जत, जात,धर्म न बघता प्रेम करणार्यांना ,
या जगात हा समाज मिळू देईल कसे?

Marathi Kavita : मराठी कविता