Author Topic: औषधाने रोगी मरतो  (Read 474 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
औषधाने रोगी मरतो
« on: November 25, 2014, 09:09:27 PM »
औषधाने रोगी मरतो
ऐसे भाग्य या देशाचे
तसेही अर्धे मरणार होते
हिशोब कशाला अर्ध्यांचे

मरणाची सवय आम्हा
आम्ही चिमण्यांचा थवा
रोज एक झडप पडते
घेवून जाते एका जीवा
 
तसेही मरणा तयार असतो
एकाध चान्स घेवून बघतो
चार दिवस जगणार असतो
दोन दिवस लवकर जातो

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: November 27, 2014, 10:56:16 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता