Author Topic: मार्मिक  (Read 589 times)

Offline gajabhauchougule

  • Newbie
  • *
  • Posts: 9
मार्मिक
« on: November 25, 2014, 10:18:18 PM »
मार्मिक
+-+-+
मागणे वसंताचे जरी ठीक  होते
 वागणे जिवनाचे भाविक होते
कोणत्या फुलांचे मी नांव आठवू
उमलने कळ्यांचे ठराविक होते
तो कसा पुर होता नदीचा
लाटात बुडालेले नाविक होते
प्रश्न साधाच होता विचारला
समजावने किती लाडीक होते
त्यांना कसा माझा हिशेब देऊ
कोणी वजा कोणी अधिक होते
कोणत्या नात्याचा मी आधार घेऊ
जगण्यातील मरणे मार्मिक होते
    गजाभाऊ चौगुले
    (पेठ) वडगांव
    ९९७०२०९६३३

Marathi Kavita : मराठी कविता