Author Topic: पाने  (Read 514 times)

Offline gajabhauchougule

  • Newbie
  • *
  • Posts: 9
पाने
« on: November 25, 2014, 10:51:55 PM »

        :(/पाने/ :(
पाउल खुणा त्या ओल्या
श्वासांनी होत्या जपल्या
पाकळ्या फुलांच्या सा-या
रंगानी होत्या सजल्या

या बागा फुलण्यासाठी
गाण्यांची नौबत झाली
डोळ्यात आसवे सारी
रक्तांनी होती न्हाली

माळला रुतुंनी आता
मोगरी फुलांचा गजरा
त्या बागेवरती आता
एकेक नवा हुजरा

हातांची चाळण झाली
राबून फाटले हात
का?फकिर पुन्हा येतो
ते नवीन गाणे गात

पायांच्या भेगावरती
कोरले कुणाचे गाणे
हे हात कुणाचे होते
तोंडाला पुसली पाने
 
गजाभाऊ चौगुले
(पेठ)वडगांव
९९७०२०९६३३

Marathi Kavita : मराठी कविता