Author Topic: बाबा-महंत  (Read 423 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
बाबा-महंत
« on: November 25, 2014, 11:29:54 PM »
बाबा-महंत...

बाबा, महंत, बुवा, महाराज
धंदा यांचा झाला मोठा;
सुशिक्षितां मध्ये वावर यांचा
हल्ली वाढतोय फार मोठा !

बाबा, महंत, बुवा, महाराज
कलाकार, पुढारी, आधार मोठा;
श्रध्देच्या अंध, स्वैर बाजारी
भोंदू मोठा न् देव खोटा !

बाबा, महंत, बुवा, महाराज
कमावतात पण पैसा मोठा;
मठ, आश्रम व्याप यांचा
ऐहीक सुखा यां नाही तोटा !

©शिवाजी सांगळ॓

Marathi Kavita : मराठी कविता