Author Topic: प्रवास  (Read 919 times)

Offline Csushant

  • Newbie
  • *
  • Posts: 9
प्रवास
« on: November 29, 2014, 06:45:04 PM »

न असे कोणता किनारा,
न उगमस्थान काही,
प्रवासी मी या जगीचा,
वणवण  भटकत राही!

कधी  निघता मनाच्या प्रवासा,
न तिथे स्थलकाल काही,
त्या मनाचा सत्व-अंत शोधता,
हरवून बसतो मलाच त्या ठायी!

कधी निघता ज्ञानाच्या प्रवासा,
न बांधे त्यास सीमा कुठली,
त्या ज्ञानाची गोळाबेरीज करता,
बाकी फक्त  शून्य  राही!

कधी निघता माझ्याच प्रवासा,
न ठाव खरा कोण मी,
मीच माझ्या अंतरी डोकावता,
मला दिसे निरंतर पोकळी !!!

Marathi Kavita : मराठी कविता