Author Topic: ॥ हे माझं पाणी,हे तुझं पाणी ॥  (Read 684 times)

Offline Rajesh khakre

 • Jr. Member
 • **
 • Posts: 167
॥ हे माझं पाणी,हे तुझं पाणी ॥

हे माझं पाणी,हे तुझं पाणी
पाण्याच्या भांडणांनी डोळा आले पाणी

कुणाच्या ऊसाला कुणाच्या घशाला पाणी
कुणाच्या शेततळ्याला कुणाच्या डोळा पाणी

कुणी तर आज हक्क मागतो पाणी
पाण्यातल्या माणूसकीचं आटलं आज पाणी

अगणित आगी विझतात ज्यांनी
पेटलेले आहे आज तेच पाणी

दर उन्हाळ्यात माझे तुझे पाणी
पावसाळी पाणी जाऊ दे वाहूनी!

विसरलो का आम्ही संताची ती वाणी
तहानलेल्या गाढवा गंगेचे ते पाणी

पाण्याच्या दुष्काळा येईल ही पाणी
माणूसकीचं अवर्षण शमवावे कोणी?

--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: ॥ हे माझं पाणी,हे तुझं पाणी ॥
« Reply #1 on: December 13, 2014, 11:50:06 AM »
छान ........ :(

Offline Rajesh khakre

 • Jr. Member
 • **
 • Posts: 167
Re: ॥ हे माझं पाणी,हे तुझं पाणी ॥
« Reply #2 on: December 17, 2014, 06:15:41 PM »
धन्यवाद सर