Author Topic: अप्रिय आतंकवाद्यास,  (Read 702 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
अप्रिय आतंकवाद्यास,
« on: December 17, 2014, 06:20:12 PM »
अप्रिय आतंकवाद्यास,
---
असेल ही तुझा आतंकपणाचा धर्म
आणि तुझी निर्दयतेला लाजविणारी कर्म
AK-47ने तुझा धर्म सुरु होतो
निरापराध बालके,  स्रिया अन,माणसे यांचे बळी घेतो
त्या अनंत लोकांच्या अश्रुंची तुझ्या लेखी ती किमंत किती
जेव्हा तुझ्यासारखे अगणित आत्मघातकी बाँम्बने स्वत:स उडविती
येतात कितेकदा तुझ्या तोंडावर त्या रक्ताचे फवारे
एकदा बघ ते रक्त तरी कोणत्या धर्माचे रे
मला माहित आहे तुझा कुठला धर्म असु शकत नाही
कारण धर्म कुठला एवढा क्रुर असत नाही
तुला मनोरुग्ण म्हणावे की या जगाची कीड
माणूसकीच्या मनातली तु सर्वात मोठी चीड
तुझ्या हैवानपनाची ही चीड येते रे
तु माणूस नावाने जन्मला हे दुर्दैव किती रे!
तु काय साध्य करणार हे तुलाच माहीत असु दे
तुला कुठला असाध्य रोग जडला हे तुला माहीत का रे?

---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता