Author Topic: हे माझ्या शिवछत्रपती राजा  (Read 782 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
हे माझ्या शिवछत्रपती राजा
जेव्हा कुणी तुमचं नाव घेवून
आमच्या समोर येतात तेव्हा..
त्याची कार्यशैली
पाहिल्या वाचून
नीट जाणल्या वाचून
आम्ही त्याला आपला मानतो
कदाचित त्याला
काही सोयर सुतकही नसत
तुमच्या गौरवशाली नावचं
श्रेयाच पराक्रमाचं
त्याला हवं असतं एक नाव 
आपल्यावर शुचिर्भूतेचा शिक्का मारायला
अन त्याचं उदिष्ट पूर्णही होतं
कारण तुमचे नाव ऐकताच
आमचा हात थबकतो
श्वास थांबतो
कणकण नम्र होतो.
आम्ही तुम्हाला विकले गेलेलो आहोत
तुमच्या नावावरच मोठे झालेलो आहोत
आमच्या रक्तातील तुमचे असण
हे आमचे बलस्थान आहे अन
एक मर्मस्पर्शी कमजोरीही

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: December 21, 2014, 01:00:16 PM by MK ADMIN »