Author Topic: मी मलाच  (Read 1103 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,276
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
मी मलाच
« on: December 19, 2014, 11:11:27 PM »
मी मलाच
मावळता सुर्य कधी दिसला नाही
मी ग्लासात चंद्र शोधीत होतो !

अंधार सावल्यां गर्दी मधून कधीचा
मी मलाच मोकळा करीत होतो !

कंदिल भास दूर अंधुक धूसर
मी प्रकाश शलाका जमवीत होतो !

शोध घेता यावा म्हणुनी आपला
मी मलाच प्रश्न विचारीत होतो !


©शिवाजी सांगळ॓

Marathi Kavita : मराठी कविता