Author Topic: इतकी इनायत मज करू नका  (Read 575 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
इतकी इनायत मज करू नका
« on: December 26, 2014, 11:25:38 AM »
इतकी इनायत मज करू नका
माझ्या नावाने; स्वतःचे खिसे भरू नका !

ह्रुदयाला मारून माझ्या आसूड
सूड माझ्याशी घेऊ नका !

करतो इंतकाल मी जवळ
त्याचा गुन्हा समजू नका !

आहे मला ही इभ्रत थोडी
तिच्याशी खेळी करू नका !

आहे माझीही थोडी आकांक्षा
तिच्या नावाने खेळ मांडू नका !

न्याय देण्यासाठी मज पून्हा
खोटे खोटे भांडू नका !

नाही दया माया तुमच्या पाशी
कीती करू मी उटारेटा !

जरी बोललो काही उग्र तुम्हा
उच्छेद माझा करू नका ! !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता

इतकी इनायत मज करू नका
« on: December 26, 2014, 11:25:38 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):