Author Topic: भयभीत मी देवाच्या दारी  (Read 635 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
भयभीत मी देवाच्या दारी
« on: January 17, 2015, 11:46:53 PM »
भयभीत मी
देवाच्या दारी
नम्र वाकला
शंकित जरी

अनेक आशा
बाळगत अंतरी
अडाणी कळपी
होवून बाजारी

आज नाही तर
उद्याला तरी
दयाळू पावेल
देव कधीतरी

तुष्ट्वत पुजारी
टाळीत भिकारी
पुनःपुन्हा जात
राहिलो मंदिरी

लोचट मनी
नवस उधारी
येताच शंका
गजर करी

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: January 18, 2015, 05:15:36 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता