शोभादर्शक
निरनिराळ्या रंगांचे आरसे वापरुन
त्याने शोभादर्शक बनविला.
लाल, निळ्या, पिवळ्या, निळ्या
अशा रंगीबेरंगी काचेच्या तुकड्यांना
त्याने कैद केले
जीवनाच्या निर्वात पोकळीत
आणिक जरासा धक्का दिला.
तेव्हापासून सुरू झालेले चक्र
दु:खाचे, सुखाचे, विजयाचे, पराजयाचे,
सन्मानाचे, अपमानाचे, रागाचे, लोभाचे
अजूनही फिरतेच आहे.
ह्या चक्राची गती
गुंगवून टाकते मती,
तासन् तास निरखून पाहुनही
शून्य उरते हाती.
ह्या शोभादर्शकाची शोभा पाहताना
कसे संपते आयुष्य कळत नाही,
काही काहीं कोनांत तो
पुन्हा कधीच वळत नाही...
--अमोल मांगलकर