Author Topic: कोडे  (Read 621 times)

Offline djyashwante

  • Newbie
  • *
  • Posts: 4
कोडे
« on: January 30, 2015, 05:55:59 PM »
नभात घिरट्या मारून थकलो
काय करावे सुचेना …
काय बर मी शोधीत होतो,
माझे मलाच समजेना !

आजवर ना घडले कधी
काय हरवले कळेना …
संभ्रमात मी पडलो असा,
उत्तर काही मिळेना !

सुटता सुटेना प्रश्न हा
उलगडा काही होईना …
काय लागले वेड असे,
हा विचार मनातून जाईना !

कोडे हे सुटले शेवटी
जीवनाशी होता तो सामना …
मलाच मी शोधीत होतो,
काय म्हणावी ही भावना !


कवी - दिपक यशवंते "मैत्रेय"
९८१९९७८०९०

Marathi Kavita : मराठी कविता