Author Topic: शेतकर्याच्या मालाला महाग नका म्हणू  (Read 555 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
शेतकर्याच्या मनाला नका तुम्ही हिणवू
शेतकर्याच्या मालाला महाग नका म्हणू ॥

शेतकरी धान्य पिकवी शेतात
म्हणून प्रत्येक जण भाकरी खातोय मजेत
खात्या अन्नाला थोडे जरा जागू ॥

राब राब राबून शेत सारे फुलवतो
कमी भाव मिळतो तेव्हा मनाशीच तळमळतो
त्याची व्यथा जरा थोडीशी जाणू ॥

कर्जपाणी काढून खर्च सारा करतो
उत्पन्नाचा हिशोब लावता खाली शुन्य उरतो
त्याच्या गाली थोडे हासु जरा आणू ॥

इतर वस्तु महाग असल्या तरि आम्हा चालतात
शेतकर्याचा माल घेतानाच भुवया का उंचावतात
त्याच्या जीवनी ही आनंद आम्ही आणू ॥

अन्नदाता आमचा पोटासाठी धडपडतो
आम्ही मात्र मजेने पैसे रोज उडवतो
त्याच्यासाठी करता येईल असे काही करु ॥

---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):