Author Topic: स्त्री  (Read 741 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
स्त्री
« on: February 01, 2015, 08:40:47 PM »
अश्रू पिऊनी दुःखे पचवली,
जगाला वेगळ सारूनी जगणं शिकली...

मिटवूनी तहान भुक साऱ्यांची,
क्षणोक्षण झुरूण जगणं शिकली...

सुख दुःखात सहभागी साऱ्यांच्या,
सुख हरवूनी दुःखासंगे जगणं शिकली...

सहून शोषण आपल्यांसाठी,
सारे साठवून ह्रदयात जगणं शिकली...

सर्वांसमोर राहूनी उभी नजर झूकवुनी,
नजरे आड होऊनी कण-कण जगणं शिकली...

दुर झाले सारे सोडूनी दुःखात एकटीला,
सर्वांना जवळ करूनी हसणं शिकली...

पाडूनी गुलामींच्या भिंती साऱ्या,
गुलामीला झूगारून जगणं शिकली...

दडवूनी स्वप़्न डोळ्यात सारी,
साकारून सारी स्वप़्न जगणं शिकली...

- गणेश म. तायडे
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता